महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्याला मातीत घालण्याचा सरकारचा निश्चय, उद्योजकांच्या मागण्यांवरुन धनंजय मुंडे आक्रमक - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे

राज्यातील उद्योजकांच्या मागण्यांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडे

By

Published : Sep 8, 2019, 7:12 PM IST

मुंबई - राज्यातील उद्योजकांच्या मागण्यांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्योग विभाग, एमआयडीसी हे भ्रष्टाचाराचे व दलालांचे अड्डे झाले आहेत. राज्यातील उद्योजकांनी कर्नाटकाचा मार्ग धरलाय. राज्याला मातीत गाडण्याचा निश्चय या दळभद्री सरकारने केला असल्याचे मुंडे म्हणाले.

भाजप सरकार हे उद्योजकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. औद्योगिक प्रगतीस आळा घालण्याचे काम हे सरकार करत आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही राज्य सरकार उद्योजकांच्या मागण्या प्रलंबित ठेवत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योजकांनी कर्नाटकचा मार्ग धरला आहे.

गेल्या ७ ते ८ वर्षापासून औद्योगिक वीजदर कमी करावेत यासाठी राज्यातील उद्योजक प्रयत्न करत आहेत. सरकार बदलले मात्र, धोरण बदलले नाही. वीजेचे दर कमी करा अन्यथा आमचे उद्योग कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करु असा इशाराही उद्योदकांनी दिला आहे. येत्या ११ सप्टेंबरला कर्नाकचे उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्यासोबत महाराष्ट्रातील उद्योजकांसोबत बैठक आहे. या बैठकीला राज्यातील १०० च्या वर उद्योजक हजर राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details