महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंकजा मुंडेंचा मोबाईल खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा, धनंजय मुंडेंचा आरोप

मोबाईलच्या खरेदीतही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.

By

Published : Mar 7, 2019, 8:45 PM IST

धनंजय मुंडे

मुंबई - चिक्की घोटाळ्यानंतर आता मोबाईलच्या खरेदीतही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. यामध्ये ६५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचेही मुंडे म्हणाले.

पॅनासोनिक कंपनीने मागील एक वर्षभरापूर्वी आपले उत्पादन थांबवलेल्या पॅनासोनिक अलोगा- I७ या मोबाईल खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचे मुंडे म्हणाले. चिक्की घोटळ्यानंतर आता पंकजा मुंडेंवर मोबाईल घोटाळ्याचा आरोप करत धनंजय मुंडेंनी याविषयी आता मुख्यमंत्री चौकशी करणार का, असा सवाल केला. राज्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना बेस्ट अँड्रॉइड फोन घेण्याला मजूरी देण्यात आली होती. त्यानुसार जवळपास १ लाख २० हजार ३३५ फोन विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार या विभागाने नुकतेच १०६ कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी केले असून, त्यात तब्बल ६५ कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा दावा मुंडेंनी केला.

मागील अधिवेशनात मी एक संशय व्यक्त केला होता. त्याचवेळी मायक्रोमॅक्सचे मोबाईल खरेदी केले जाणार होते. मात्र, आत्ता २८ तारखेला घेतलेल्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला असल्याचे मुंडे म्हणाले.

जे मोबाईल खरेदी करण्यात आले आहेत, ते ८ हजार ७७७ या दराने घेतले आहे. यासाठी १०६ कोटी ८२ लाखांचा खर्च केला. यात ६५ कोटींचा घोटाळा झाला आहे. सरकारने पॅनासोनिक कंपनीकडूनच मोबाईल घेण्याचा घाट का घातला? बाजारात दुसरे नव्हते का? एवढी ऑर्डर दिली तर किती सूट मिळू शकते. त्यातही कोणी कमिशन घेतले? असे सवाल मुंडेंनी यावेळी केले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details