महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्नशील' - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी प्रयत्नशील

ज्या प्रश्नांसाठी मी भांडलो, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे, शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार असल्याचे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. तसेच धनगर आरक्षणासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही मुंडे म्हणाले.

Dhananjay munde comment on dhangar reservation
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

By

Published : Jan 27, 2020, 4:01 PM IST

मुंबई - ज्या प्रश्नांसाठी मी भांडलो, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे, शेवटच्या क्षणापर्यंत काम करणार असल्याचे वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. तसेच धनगर आरक्षणासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही मुंडे म्हणाले.

गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाज आरक्षणाची मागणी करत आहे. आरक्षणाबद्दल धनंजय मुंडेंना प्रश्न विचाला असता ते म्हणाले की, माझा इमान या जनतेशी जोडला गेला आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. जनतेला वाऱ्यावर सोडणार नसून, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासाठी काम करणार आहे. तसेच येणाऱ्या काळात बीड जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही मुंडे म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details