मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासाची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकाँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारावरुन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
'ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचे कवच त्याला भय कोणाचे' - शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासाची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासाची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारावरुन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
!['ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचे कवच त्याला भय कोणाचे' dhananjay munde comment on bjp](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5824363-thumbnail-3x2-kakaka.jpg)
ज्या व्यक्तीला जनतेच्या मायेचे कवच आहे. त्याला भय कोणाचे. केंद्र सरकारच्या सुकुचित, कोत्या प्रवृत्तीचा निषेध आहे असे ट्वीट करत धनंजय मुंडेंनी भाजपवर निशाणा साधला. ईडीची चौकशी झाली, मेगाभरती करून आमदार फोडले, आता काय तर सुरक्षा काढली. किती नीच पातळी गाठणार? असा सवाल करत त्यांनी भाजपवर खरमरीत टीका केली.
६ जनपथ हे शरद पवारांचे दिल्लीतील निवासस्थान आहे. २० जानेवारीपासून या निवासस्थानाची सुरक्षा हटवण्यात आली असल्याची माहिती शरद पवार यांच्या दिल्लीतील कार्यालयातून देण्यात आली आहे.