मुंबई - प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनाथ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. यानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. केंद्र सरकारने हा निर्णय आकसापोटी घेतला आहे. यातून भाजपात ठायी ठायी उद्विग्नता दिसत असल्याचे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केले. महाविकास आघाडीचा इतका पोटशूळ का? असा सवालही मुंडेंनी यावेळी केला.
भाजपमध्ये ठायी ठायी उद्विग्नता, महाविकास आघाडीचा इतका पोटशूळ का? - धनंजय मुंडेंची केंद्र सरकारवर टीका
जासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनाथ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. यानंतर केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना दिसत आहे. केंद्र सरकारने हा निर्णय आकसापोटी घेतला आहे. यातून भाजपात ठायी ठायी उद्विग्नता दिसत असल्याचे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडेंनी केले.
![भाजपमध्ये ठायी ठायी उद्विग्नता, महाविकास आघाडीचा इतका पोटशूळ का? dhananjay munde comment on bjp](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5575084-thumbnail-3x2-yyyyy.jpg)
महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही परवानगी नाकारली आहे. यावर राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. तरीसुद्धा सरकारने का परवानगी नाकारली?असा सवाल विरोधक करत आहेत.
प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये राजपथावर संचालनात सर्व राज्ये चित्ररथाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा दर्शवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राला २०१८ मध्ये चित्ररथासाठी पहिला क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्राने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ साकारला होता. महाराष्ट्राच्या चित्ररथाला आतापर्यंत ६ वेळा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.