महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर हुकूमशाहीचा उदय झालाच! धनंजय मुंडेंचा भाजपवर निशाणा - काँग्रेस-जेडी

साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर करत भाजपने कर्नाटकातले सरकार पाडले आहे. अखेर हुकूमशाहीचा उदय झालाच! असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

कर्नाटक नाट्यावरुन धनंजय मुंडेंचा भाजपवर निशाणा

By

Published : Jul 24, 2019, 10:21 AM IST

मुंबई - साम, दाम, दंड, भेद या सर्व गोष्टींचा वापर करत भाजपने कर्नाटकातले सरकार पाडले आहे. अखेर हुकूमशाहीचा उदय झालाच! असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.

कर्नाटकमध्ये बहुमत चाचणीत काँग्रेस-जेडी(एस)च्या बाजूने ९९ तर, भाजपच्या बाजूने १०५ आमदारांनी उभे राहुन पाठिंबा दिला. यानंतर कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर अखेर पडदा पडला आणि कुमारस्वामींचे सरकार कोसळले. कुमास्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी लगभग सुरू केली आहे. यावर धनंजय मुंडेंनी जोरदार निशाणा साधला. आम्हाला जी भीती होती ती आता सत्यात उतरत आहे. बहुमताच्या जोरावर भाजप आता कोणतेही निर्णय घेत असल्याचे मुंडे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details