मुंबई - मुसळधार पावसाचा नवी मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील बऱ्याच भागाला फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, राज्याचे सत्ताधारी निवडणुकांपूर्वीच्या यात्रा व बैठकांमध्ये व्यस्त असल्याचे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सत्ताधारी भाजप-सेनेवर निशाणा साधला.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत, सत्ताधारी मात्र यात्रेत व्यस्त - धनंजय मुंडे
मुसळधार पावसाचा नवी मुंबई, ठाणे, पालघरसह राज्यातील बऱ्याच भागाला फटका बसला आहे. बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन, जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, राज्याचे सत्ताधारी यात्रा आणि बैठकांमध्ये व्यस्त आहेत, असे म्हणत धनंजय मुंडेंनी सत्ताधारी भाजप आणि सेनेवर निशाणा साधला.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये, रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, वेस्टर्न रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कालपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल देखील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसामुळे रुळांवर पाणी साचले असल्याने तिन्ही मार्ग आता ठप्प झाले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
'जनतेला कोणी वाली आहे का नाही,' असा प्रश्न करत धनंजय मुंडेंनी सरकारवर निशाणा साधला. सगळा कारभार यात्रेतून सुरू असल्याचेही मुंडे म्हणाले.