मुंबई - पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात मेळावे घेत आहेत. त्यांच्या मेळाव्यांना तरुणांचा मोठा प्रतिसाद आहे. पवारांचा हा झंझावात पाहून भाजपला घाम फुटला आहे. त्यामुळे पवारांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून केली आहे.
हेही वाचा - माझ्यावर ईडीने गुन्हा दाखल केला असेल तर त्याचे स्वागत - पवार
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेत झालेल्या 25 हजार कोटींच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी आणि 'ईडी'ने अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. यावर धनंजय मुंडेंनी आपल्या ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे.