मुंबई - मुंबईतील माहीम दर्गा येथे सुरू असलेल्या 10 दिवसांच्या जत्रेत भाविकांची गर्दी होत (Devotee Crowd At Mahim Darga ) आहे. 14व्या शतकातील सूफी संत मखदुम फकीह अली माहिमी यांची कबर माहीम दर्गा येथे (10 Days fair at Mahim Darga ) आहे.
Mahim Darga : माहीम दर्ग्यात 10 दिवसांची जत्रा; उरुससाठी भाविकांची गर्दी - Devotee Crowd At Mahim Darga
माहीम दर्गा येथे 10 दिवसांची जत्रा सुरू झाली (10 Days fair at Mahim Darga )आहे. त्यांमुळे तिथे भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. सूफी संत मखदुम फकीह अली माहिमी यांची कबर माहीम दर्गा येथे ( Sufi saint Makhdum Fakih Ali Mahimi )आहे.

संत आणि विद्वान : मखदुम अली महिमी शफई यांचा जन्म १३७२ साली झाला. तर मृत्यू १४३१ साली झाला. मखदुम अली महिमी शफई आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संत आणि विद्वान होते. ते तुघलक घराण्यातील आणि गुजरातच्या सुलतान अहमद शाहच्या काळातील होते. सुलतान अहमद शाहच्या बहिणीशी त्यांचा विवाह झाला होता. ते त्यांच्या ग्रंथ, उदारमतवादी विचार आणि मानवतावादी आदर्शांसाठी ओळखले जातात. माहिमीचा जन्म इराकमधील अरब घराण्यातील कुटुंबात झाला. कालांतराणे ते माहीम येथे स्थायीक झाले. त्यांच्या बालपणाबद्दल फारशी माहिती नाही. नंतर ते मीर सय्यद अली हमदानी शफई यांच्या शिष्यांचे अनुयायी झाले होते.