मुंबई -आज राज्यभरात गणपती विसर्जनाची धूम सुरू आहे. गणेशोत्सव हा फक्त एक उत्सव न राहता सणाच्या रूपात संपूर्ण जगभर साजरा केला जातो. बाप्पांच्या दर्शनाला देश-विदेशातूनही भाविकांची वर्णी लागत असते. यंदाही थायलंडवरुन काही भाविक गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गिरगाव चौपाटीवर आले आहेत.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत थायलंडमधून आलेल्या भाविकांचा बाप्पांना निरोप - भाविकांची वर्णी
गणेशोत्सव हा फक्त एक उत्सव न राहता सणाच्या रूपात संपूर्ण जगभर साजरा केला जातो. बाप्पांच्या दर्शनाला देश-विदेशातूनही भाविकांची वर्णी लागत असते. यंदाही थायलंडवरुन काही भाविक गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन गिरगाव चौपाटीवर आले आहेत.

आज अनंत चतुर्थीच्या दिवशी मुंबईकरांबरोबर थायलंडवरुन आलेले गणेशभक्तही बाप्पांना निरोप द्यायला गिरगाव चौपाटीवर जमले आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोश करत, हातात गणपतीचा मूर्ती घेऊन तेही विसर्जनात आनंदाने सामिल होत आहेत. आम्ही आपल्या परिवाराबरोबर येथे अनंत चतुर्थी साजरी करायला आलो आहोत. आम्हाला गणपती बाप्पा, मुंबई आणि भारत आवडतो असे एका भाविकाने सांगितले. तसेच या गणेशभक्तांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषही केला.
हेही वाचा - धर्माधिकारी प्रतिष्ठान गिरगाव चौपाटीवर जमा करतंय निर्माल्य; बनविणार गांडूळ खत