महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकार-पालिकेची ५ लाख मदत- मुख्यमंत्री - विधानपरिषेदेत

मुंबईत झालेल्या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख तर महापालिकेकडून 5 लाख देण्यात येणार आहे. तसेच घरे पुनर्वसित केल्या जाईल, ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना खावटी आणि इतर मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

देवेंद्र फडणवीस

By

Published : Jul 2, 2019, 6:21 PM IST

Updated : Jul 2, 2019, 6:39 PM IST

मुंबई - मुंबईत सध्या अनेक दुर्घटना घडत आहे. अनधिकृत बांधकाम तसेच पावसामुळे काहींना जीवही गमवावा लागला. विरोधकांनी याप्रश्नांवर सरकारला चांगलेच धारेवर धरले. विधानपरिषेदेत मुख्यमंत्र्यानी याविषियी काही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार मुंबईत झालेल्या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाख तर महापालिकेकडून 5 लाख देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच घरे पुनर्वसित केल्या जाईल, ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांना खावटी आणि इतर मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत २८९ अन्वये मुंबईतील मालाड, साकीनाका आदी ठिकाणी झालेल्या दुघटनेसंदर्भात चर्चा उपस्थित करण्यात आली होती. मुंबईत घडलेल्या दुर्घटनांमध्ये अनधिकृत बांधकाम अथवा चुकीच्या मान्यता दिल्या असतील तर दोषी अधिकाऱयांवर कारवाई केली जाईल. तसेच अतिक्रमणाच्या संदर्भात जे काही प्रश्न आलेले आहेत, त्यासाठी दोन्ही सभागृहातील सदस्यांची बैठक घेऊन त्यासाठी कोणत्या उपाययोजना आखल्या जातील यावर निर्णय घेऊ असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरात कल्याणमध्ये जी दुर्घटनाची माहिती दिली. त्या दुर्घटनेत दोन व्यक्ती आणि एक लहान मुलगी मृत्यू पावली. ही भींत तलावाच्या बाजूला असल्याने त्या भिंतीला अधिक पावसाचा भार सहन झाला नाही. त्यामुळे ही घटना घडली. त्यांनाही पूर्ण मदत केली जाईल. आंबेगाव तालुक्यातील येथेही जी घटना झाली त्याठिकाणी २६७ साईटवर भेट देवून काही ठिकाणी कारवाईही केली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
मुंबई तुंबण्याची कारणे अनेक आहेत. मुंबई ही कोस्टल शहर आहे. सखल भाग आहे. मोठी भरती आल्यानंतर पाणी साचते. आठ पंपींग स्टेशनची केंद्र तयार करायची होती. ही स्टेशन समुद्राच्या पाण्यापेक्षा जास्त गतीने पाणी बाहेर फेकते. हाजी आली, इर्ला, ब्रिटानिया आदी पाच केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होते. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी फेकण्याचे काम झाले. कुठे पाणी साचले कमांड अँड कंट्रोलकडून माहिती मिळत असते. माहुल आणि मोगरा येथे दोन पंपिंग स्टेशन करण्याची गरज आहे. त्यासाठी जमिनी मिळणे तसेच आदी अनेक परवानग्यांची गरज असते. तीला सगळ्या मान्यता मिळाल्यानंतर तीही सुरू केली जाणार आहेत. हे दोन केंद्र तयार झाली तर सेंट्रल लाईनवर पाणी साचणार नाही. पुढच्या वर्षी सेंट्रल लाईनचा प्रश्न निर्माण होणार नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली.

नालेसफाईच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली. त्याचे सर्व रेकॉर्ड ठेवण्यात आली आहेत. मागच्या काळात ज्यांनी गडबडी केल्या त्यांना हे कामे देण्यात आलेली नाहीत. पाऊस जास्त पडल्याने नालेसफाई झाली असली तरी अनेक अडचणी निर्माण होतात. अतिक्रमण झोपडपट्या अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही ठिकाणी हे काम शक्य झाले. नाल्या, नदीच्या कोसमध्ये असलेली अतिक्रमणे काढावीच लागणार. मी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. पावसाळा संपल्यानंतर ही कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. डोंगरी भागाच्या पायथ्याशी ज्या झोपड्या आहेत. त्या भागात दरड कोसळली तर मोठी घटना होऊ शकते. त्यामुळे याचाही तात्काळ सर्वे करून मापिंगनुसार तेथील लोकांना दुसरीकडे हलविण्याचेही निर्देश दिलेले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ड्रेनेजचे मॅपिंग केलेले आहे. परंतु पुढील कारवाई केली नाही. त्याच्यावर कुठे अतिक्रमण झालेले आहे का, कुठे पाणी थांबते काय, त्याही संदर्भातील निर्णय दिलेले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Last Updated : Jul 2, 2019, 6:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details