महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिहारच्या जनतेला जंगलराज नव्हे तर विकास हवा आहे - देवेंद्र फडणवीस - devendra fadnvis congratulate to bihar public

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा नेत्यांनी या यशाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत.

bihar election result reaction of devendra fadnvis
बिहार विधानसभा देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया

By

Published : Nov 11, 2020, 7:01 AM IST

मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती आले आहेत. यात एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहार निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपा नेत्यांनी या यशाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. मात्र दिवसभरात फडणवीस यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना मध्यरात्री त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.

फडणवीसांचे आभार
फडणवीस यांनी सोशल माध्यमावर बिहार निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. धन्यवाद बिहार! बिहारच्या जनतेने हे स्पष्ट केले आहे की त्यांना जंगलराज नव्हे तर विकास हवा आहे! आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे.जनतेने नितीशकुमारांवर पूर्ण विश्वास दाखवला आहे. मी बिहारच्या जनतेचे अभिनंदन करतो आणि त्यांचे अभिवादन करतो, अशा शब्दात त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. फडणवीस म्हणाले, बिहारमधील भाजपाने 110 जागा लढवल्या आणि जिंकलेल्या जागांची टक्केवारी 67% आहे. 2015 च्या निवडणुकीत ते 34% होते. याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणकारी अजेंडा आणि आमच्या सर्व कष्टकरी कामगारांना जाते. त्यामुळे पुन्हा मी संघ भाजपा बिहारचे अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांना शुभेच्छा
तसेच कोरोना कालावधीत संपूर्ण बिहारने या निवडणुकीत जोरदारपणे भाग घेतला आणि जगासमोर एक उदाहरण ठेवले. ही प्रसिद्ध निवडणूक घेण्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे खूप आभारी आहे. देशातील 11 राज्यांमधील पोटनिवडणुकीतही भाजपाला मोठे यश मिळाले आहे. बिहारसह सर्व राज्यांत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शश्रद्धेची ही एक लाट आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर सर्व राज्यांतील आमच्या भाजप कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -ओडिशाच्या कालाहांडीतील 'पॅड वुमेन'

हेही वाचा -जोधपूरमध्ये निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details