महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Eknath Shindes leave News : मुख्यमंत्री पदाचा कारभार पुन्हा फडणवीस यांच्याकडे... जाणून घ्या कारण - देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कारभार

राज्यात मुख्यमंत्री पदी कोण होणार? याबाबत अनेक नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे विधान करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून सलग तीन दिवस तातडीच्या रजेवर गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या रजेचे कारण गुलदस्त्यात आहे.

Eknath Shindes leave News
मुख्यमंत्री रजेवर

By

Published : Apr 25, 2023, 12:49 PM IST

Updated : Apr 25, 2023, 12:58 PM IST

मुंबई - काळजावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद बहाल केल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. वारंवार त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याची मुख्यमंत्री असल्याची चर्चा भाजपकडून केली जाते. शिंदे आणि भाजप गटामध्ये सगळे आलबेल असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी सध्याच्या राजकीय नवनव्या समीकरणाच्या चर्चेमुळे अंतर्गत धुसफूस वाढली आहे. भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या नवनव्या विधानावरून शिंदे गटातील बहुतांश आमदार नाराज असल्याचे बोलले जाते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या तातडीच्या रजेवर गेल्याने त्यात भर पडली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या मूळ गावी गेले आहेत. खासगी कामांसाठी ते सुट्टीवर असल्याचे समजते. दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे भाजप नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्र्यांकडे कारभार आल्याची चर्चा देखील रंगली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील गावात जाऊन शेतीकाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विरोधकांनी यावरून मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली होती. आता मुख्यमंत्री अचानक तीन दिवसांसाठी गावी गेल्याने विरोधकांकडून शालजोडे लागवले जात आहेत. भाजप नेत्यांच्या सततच्या विधानांमुळे मुख्यमंत्री शिंदे नाराज आहेत. त्यामुळे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. कारण, मुख्यमंत्री भाजपचा व्हावा... मुख्यमंत्री शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाची आदलाबदल करावी, अशी भाजप नेत्यांची मागणी असल्याचा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी काढला आहे.


शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील-शिवसेना ठाकरे गटातील सात आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्यासोबत येणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षाचा बडा नेतादेखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. अशा भरपूर चर्चा आहेत. त्या सत्यात उतरतील, आम्ही त्याचा विचार करू. परंतु, मुख्यमंत्री शिंदे हेच दीड वर्ष मुख्यमंत्री पदी राहतील. याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढची विधानसभेची निवडणूक होईल, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Last Updated : Apr 25, 2023, 12:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details