मुंबई:सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे अचानक राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला जाणे, या संदर्भात गुजरातमधील वर्तमानपत्रात बातमी येणे किंवा दिल्लीश्वरांनी तातडीने बोलावून घेणे, हे राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कधीही पाहिले नव्हते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सलग ३ दिवसांची रजा घेतली. या ३ दिवसांमध्ये त्यांनी सलग पूजा केली म्हणे… तर पूजा वगैरे कशासाठी होत आहेत, याचा काय अर्थ लावला पाहिजे; पण याबाबत ११ ते १३ मे दरम्यान बरचसे चित्र स्पष्ट झालेले असेल, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
फडणवीस यांचा पुन्हा येण्यासाठी प्रयत्न:सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या आहेत की, यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा सत्तेत मुख्य पदावर येण्यासाठी आपल्या जिवाचा आटापिटा केला होता. आता पुन्हा येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु दिल्लीश्वरांनी त्यांना तंबी दिली. आता बास झाले, असे सांगितले आहे. कारण, फडणवीसांच्या सध्या सुरू असलेल्या उठाठेवीमुळे भाजपची प्रतिमा खराब झाली आहे, असेही अंधारे म्हणाल्या. त्याचबरोबर आताच झालेल्या विधानपरिषद निवडणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालानंतर यांचा 'बाजार'च उठला आहे, असा टोलाही अंधारेंनी लगावला आहे.