मुंबईDevendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता डॉक्टर होणार आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये केलेल्या अनन्य साधारण कामाचा गौरव म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट ही मानद पदवी देण्याचा निर्णय जपानच्या कोयासन विद्यापीठाने (Koyasan University) घेतला आहे. अशी माहिती जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉक्टर फुकाहोरी यासुकाता यांनी दिली आहे.
120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा निर्णय : कोयासन विद्यापीठाने विद्यापीठाच्या 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पहिलीच पदवी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान केली जाणार आहे. फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य, यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबई होणार कार्यक्रम : 26 डिसेंबर रोजी जपानमधील कोयासन विद्यापीठातर्फे मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी कोयासन विद्यापीठाचे प्रोफेसर कोयासन विद्यापीठाचे प्रोफेसर इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित असणार आहे. 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्यावर गेले तेव्हा कोयासन विद्यापीठात त्यांनी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यानंतर 2018 आणि 2023 मध्ये त्यांनी जपानला भेट दिली होती. फडणवीस यांना समारंभपूर्वक ही पदवी देण्यात येणार असल्याचं फुकाहोरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
हे सुद्धा डॉक्टर : यापूर्वी महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांनी राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मानद डॉक्टर प्रदान करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री विनय कोरे यांनाही मानद डॉक्टरेट देण्यात आली आहे. मात्र जपानच्या विद्यापीठाने फडणवीस यांना दिलेली ही पहिलीच डॉक्टरेट आहे.
- हेही वाचा -
- "चिंता करु नका, मनात विदर्भच"; देवेंद्र फडणवीस यांचा विदर्भाच्या प्रश्नांवरुन विरोधकांवर हल्लाबोल
- गुजरातला हिरे उद्योग स्थलांतरित होणार नाही - देवेंद्र फडणवीस
- महाराष्ट्रात कायदा व्यवस्था उत्तम, सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार - देवेंद्र फडणवीस