मुंबई- मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज सकाळी राजभवन येथे शपथ घेतली. अचानक झालेल्या शपथविधीने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला असून यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच बडे नेते नॉट रिचेबल आहेत. अनेकांनी आपले फोन बंद करून ठेवले असून नेमका शपथविधी राष्ट्रवादीच्या संमतीने झाला की, अजित पवार यांनी हा निर्णय घेतला याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काही वेळात या संदर्भातील नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
फडणवीस-पवार यांच्या शपथविधीने राष्ट्रवादीचे नेते 'नॉट रिचेबल' - राष्ट्रवादीचे नेते 'नॉटरिचेबल'
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर ही राज्यात असे काही नवीन समीकरण तयार होईल, अशी कुणकुण कोणालाही लागली नव्हती. मात्र, आज सकाळी झालेल्या शपथविधीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर ही राज्यात असे काही नवीन समीकरण तयार होईल, अशी कुणकुण कोणालाही लागली नव्हती. मात्र, आज सकाळी झालेल्या शपथविधीने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 2 आमदार होते. त्यात अहमदपूर येथील बाळासाहेब जाधव आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे दोघेच उपस्थित होते.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते या सर्वच नेत्यांचे सकाळपासून फोन बंद आहेत. या संदर्भातील कोणती माहिती राष्ट्रवादीकडून देण्यास नकार देण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने आमच्यासोबत घात केला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रवादीच्या निर्णयाला विश्वासघात केला, असल्याची प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारे गाफील ठेवून आपल्या मित्रपक्षांना दगा देणे चुकीचे असून या संदर्भात काँग्रेस आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.