नागपूर :लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीने जोर धरला आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये विशेषतः ओळख लपवून मुलींसोबत लग्न करायचे. मुलींचे धर्मांतर करायचे अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात बाहेरही आल्या आहेत. त्यासंदर्भात सर्व बाजूने अशा प्रकारची मागणी होत आहे की, या विरोधातला कायदा केला पाहिजे. मागच्या काळात मी स्वतः सभागृहात घोषित केले होते. त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेल्या कायद्याचा आम्ही अभ्यास करत आहे. त्यानंतर आम्ही यासंदर्भात महाराष्ट्रामध्ये निर्णय करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज नागपूर विमानतळावर बोलत होते.
कर्नाटक-मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा : लव्ह जिहादच्या विरोधात राज्यात हजारोंच्या संख्येने 40 मोर्चे काढण्यात आले आहेत. मोर्चेकर्त्यांची भावना तीव्र आहेत. सर्वाधिक राज्यस्थानमध्ये तक्रारी आहेत. तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशाने धर्मांतर आणि लव्ह जिहाद याबाबत कायदा केला आहे. महाराष्ट्रात याच कायद्याचा अभ्यास करून एसओपी तयार करणार असल्याचे फडणवीस यांनी याआधीच सांगितले होते. सांगली जिल्ह्यातील आटपाडी, पुण्यातील दौंड येथे लव्ह जिहादच्या घटना समोर आल्यानंतर कायदा करण्याचा हालचाली वाढल्या आहेत. धारावी, मानखुर्द, गोवंडी आदी झोपडपट्टी आणि गरीब मुलींना धर्मांतरासाठी मुली, महिलांना आमिषे दाखवून फसवणूक केली जात आहेत. महाराष्ट्रात इस्लाम रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतराची बहुतांश प्रकरण समोर आली आहेत.