महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : नाना पटोलेंना माफ केलं; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले असं? - पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर 1

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर गेले होते. त्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी टीका केली होती. यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. तसेच 'चंद्रयान-3' च्या लँडिंगवरुनही काँग्रेसच्या टीकेलाही फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. (Devendra Fadnavis on Nana Patole) (Devendra Fadnavis Japan Tour) (Devendra Fadnavis on PM Narendra Modi)

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 7:45 PM IST

मुंबई - पाच दिवसाच्या जपान दौऱ्यावरून मुंबईत परतलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं नुकत्याच झालेल्या सर्वेमध्ये अनेक बाबी समोर आल्या. याविषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, असे कित्येक सर्वे येतात व जातात. मोदींच्या पसंतीसाठी कुठल्याही सर्वेची गरज नाही. मोदी नंबर १ वर होते, आहेत व यापुढेही राहणार.

काँग्रेस एक संभ्रमित पार्टी - 'चंद्रयान-३' च्या यशस्वी मोहिमेनंतर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसबाबत मी काय बोलणार. ती एक संभ्रमित पार्टी आहे. त्यांनी देशाबद्दल विचार करणं कधीच बंद केलं. परंतु, संपूर्ण देशाला माहिती आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती केलीये. (Devendra Fadnavis on Nana Patole) (Devendra Fadnavis Japan Tour) (Devendra Fadnavis on PM Narendra Modi)

काँग्रेसला टोला - 'चंद्रयान ३'चे यशस्वी लँडिंग होत असताना दक्षिण आफ्रिकेमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मिनिट टू मिनिट' याची माहिती घेत होते. ही मोहीम यशस्वी झाल्यावर वैज्ञानिकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना शाबासकी देण्यासाठी पंतप्रधान मोदी 'इस्रो'ला गेले. अशा परिस्थितीत पंतप्रधान त्यांना भेटायला जाणार नाहीत तर कोण जाणार? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. परंतु, विरोधक इतक्या खालच्या स्तरावरील राजकारण करतात की देशाची प्रगतीसुद्धा त्यांना बघवली जात नाही. यापेक्षा खराब परिस्थिती विरोधकांची काय असू शकते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

नाना पटोले यांना माफ करतो - देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मी जपानला फिरायला गेलो नव्हतो. तर जपान सरकारनं मला विशेष अतिथी म्हणून आमंत्रण दिलं होतं. या दौऱ्यातून मी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी काही घेऊन आलोय. नाना पटोले महाराष्ट्रभर कशासाठी फिरतात हे मला माहिती नाही. परंतु, ते माझे मित्र आहेत. ते जरी असे बोलले असले तरी मी त्यांना माफ करतो, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार; महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
  2. Nana Patole On Onion Price : कांद्यावरून राजकारण तापले; शेतकऱ्यांची थट्टा खपवून घेतली जाणार नाही - नाना पटोले
  3. Devendra Fadnavis Reaction : जपानी म्हणतात चीनपेक्षा भारतातील गुंतवणूक सुरक्षित - देवेंद्र फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details