मुंबई -महाविकास आघाडी सरकारचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे हे सरकार स्वतःच्या कृतीतूनच ढासळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत भाजपची सत्ता स्थापनेची कोणतीही चर्चा नाही व करणारही नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबद्दत त्यांना विचारले असता ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत लवकरच माझी मुलाखत घेणार आहेत. याबाबत काही अटी घालण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. भेटी दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मुलाखत जशीच्या तशी दाखवावी, मुलाखतीवेळी माझाही कॅमेरामन सोबत असेल, अशा अटी घातल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.