मुंबई- देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तर, कोरोनाबाधितांचा सर्वात जास्त आकडा हा महाराष्ट्र आहे. अशा परिस्थितीत काहींनी सोशल मीडियावर #MAHARASHTRANEEDSDEVENDRA सारखे हॅशटॅग चालवले. या अडचणीच्या वेळेत सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज असताना हे बालिश चाळे केल्याने फडणवीसांनी नेटकऱ्यांचे कान टोचले आहेत.
ट्विटरवर #MaharashtraNeedsDevendra हॅशटॅग, फडणवीसांनी टोचले नेटकऱ्यांचे कान - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री
काहींनी सोशल मीडियावर #MAHARASHTRANEEDSDEVENDRA सारखे हॅशटॅग चालवले. या अडचणीच्या वेळेत सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज असताना हे बालिश चाळे केल्याने फडणवीसांनी नेटकऱ्यांचे कान टोचले आहेत.

फडणवीसांनी टोचले नेटकऱ्यांचे कान
लोकांमध्ये भयंकर घबराटीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री घेत असलेल्या खबरदारीच्या उपाययोजना परिपुर्ण असल्याचेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.