मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडवणीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे आपण अजिबात समर्थन करत नाही. सुप्रिया सुळे काय कोणत्याही महिलांच्या संदर्भात वक्तव्य करताना भान बाळगायला पाहिजे. महिलांचा आदर हा झालाच पाहिजे,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चेंबूर येथे व्यक्त केली. गुरुनानक जयंती निमित्त चेंबूर येथे गुरुद्वारा मध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतले यावेळी ते बोलत होते.
Devendra Fadnavis : सत्तारांना समर्थन नाही, मात्र ...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया - कृषिमंत्री अब्दुल सत्तार आक्षेपार्ह
अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी केलेल्या वक्तव्याचे कुठेही समर्थन होणार नाही. महिलांचा आदर राखला गेलाच पाहिजे यात दुमत नाही. मात्र, या विरोधात अथवा चित्रपटाच्या प्रदर्शना विरोधात व्यक्त केली जाणारी प्रतिक्रिया लोकशाही मार्गाने व्यक्त व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केली आहे.
चुकीचे आरोप करू नका - अब्दुल सत्तार यांची भाषा चुकीचीच आहे. मात्र, त्याचवेळी विरोधकांनी सातत्याने खोक्यांबाबत सुरू ठेवलेला आरोप हाही चुकीचा आहे. अशा पद्धतीने चुकीचे आरोप करू नका, विरोधकांनीही आपल्या भाषेचे भान राखायला पाहिजे, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजकारणामध्ये टीका करण्याचा सगळ्यांना हक्क आहे मात्र टीका करताना ती योग्य भाषेत आणि योग्यपणे केली गेली पाहिजे. विरोध करताना तो लोकशाही मार्गाने केला पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
दादागिरी करू नका - हर हर महादेव चित्रपटाला विरोध करण्यासाठी चित्रपटाचे खेळ बंद पाडणे आणि लोकांना मारहाण करणे ही बाब योग्य नाही. लोकशाही मार्गाने विरोध करता येऊ शकतो, तशाच पद्धतीने विरोध करणे अपेक्षित आहे जर कोणी कायदा हातात घेतला, दादागिरी करून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.