महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Caste Politics : धर्माचे राजकारण महाराष्ट्रात होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांनी  खडसावले

महाराष्ट्रात धर्माचे राजकारण होणार (Devendra Fadnavis on Caste Politics) नाही. तसेच औरंगजेबाचे 'महिमामंडन' अजिबात सहन करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी (Devendra Fadnavis on Aurangzeb) अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर (Maharashtra Monsoon Session 2023) भाष्य केले आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 4, 2023, 3:20 PM IST

Updated : Aug 4, 2023, 3:47 PM IST

मुंबई - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज अंतिम आठवडा प्रस्तावाला विधान परिषदेत उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis on Caste Politics) अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यात बारसू रिफायनरी (Maharashtra Monsoon Session 2023) प्रकल्प हा होणारच, तसेच राज्यात धर्माचे राजकारण होऊ देणार नाही, असे ठामपणे त्यांनी यावेळी (Devendra Fadnavis on Aurangzeb) सांगितले आहे.

आजपर्यंत भारतीय मुसलमानांचा हिरो हा कधीही औरंगजेब नव्हता व तो होऊ शकत नाही. धर्मांचे राजकारण महाराष्ट्रात होणार नाही. मात्र, औरंगजेबाचे महिमामंडन अजिबात सहन करणार नाही - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गुंतवणूकदार पाकिस्तानात निघून गेले - बारसू रिफायनरी ही महाराष्ट्राच्या हिताची आहे. सरकारी कंपन्यांसोबत जे गुंतवणूक करणार होते, ते आता पाकिस्तानात गेले आहेत. ज्यांना देशाचा विकास नको, तीच लोकं आरे आंदोलनात, तीच लोकं बारसू आंदोलनात, तीच लोकं नर्मदेच्या आंदोलनात. कातळशिल्प आपण जपणारच आहोत, काहीही झाले तरी त्यांना धक्का लागू देणार नाही. तसेच बारसू आंदोलनाप्रसंगी कुठेही जनतेवर मारहाण झाली नाही. तशी एकही तक्रार न्यायालयात नाही. पण कुठेतरी देशाचा विचार केला पाहिजे. विरोध करणारे सर्वच देशविरोधी आहेत असे मी म्हणत नाही. कारण प्रत्येक गोष्टीसाठी दोन बाजू असतात. पण त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे सांगत बारसू रिफायनरी ही कुठल्याही परिस्थितीत होणारच, असा अप्रत्यक्ष इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

औरंगजेबाचे 'महिमामंडन' - औरंगजेबच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, मागे एकाचवेळी अनेक जिल्ह्यात औरंगजेबाचे फोटो, स्टेटस ठेवण्याचे प्रकार झाले. राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. आजपर्यंत भारतीय मुसलमानांचा हिरो हा कधीही औरंगजेब नव्हता व तो होऊ शकत नाही. यामागे कोण लोक आहेत हे लक्षात आले आहेत. धर्मांचे राजकारण महाराष्ट्रात होणार नाही. मात्र, औरंगजेबाचे महिमामंडन अजिबात सहन करणार नाही, असे ठामपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा -

  1. SC Stay Conviction Rahul Gandhi : 'मोदी' प्रकरणी राहुल गांधींना 'सर्वोच्च' दिलासा
  2. Monsoon session 2023 : मुंबई महापाल‍िका रुग्णालयातील औषध खरेदीची चौकशी - मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा
  3. Justice Rohit B Deo News: भर न्यायालयात न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिला राजीनामा, सांगितले 'हे' कारण
Last Updated : Aug 4, 2023, 3:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details