महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Politics: फडणवीस यांचे पुन्हा एकदा रात्रीस खेळ चाले...एकनाथ शिंदेंची उशिरा भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण

शिंदे फडणवीस सरकारला पुढच्या महिन्यात एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. एका वर्षा पूर्वी याच दरम्यान छुप्या पद्धतीने रात्री शिंदे - फडणवीस यांच्या भेटीगाठी होत असत, तशाच भेटीगाठी आता होऊ लागल्या आहेत की काय? अशी शंका निर्माण होत आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी होत असताना, या भेटीने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे भेट

By

Published : May 31, 2023, 10:22 AM IST

मुंबई: जागा वाटपावरून सुद्धा महाविकास आघाडीतच नाही तर शिंदे -फडवणीस गटामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याचे संकेत आहेत. विशेष करून सरकारला एक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर हा विस्तार पुढच्या महिन्यात १० तारखेपूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालात शिंदे - फडवणीस सरकारवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी १६ अपात्र आमदारांच्या तिढा अजूनही विधानसभा अध्यक्ष, राहुल नार्वेकर यांच्याकडे अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित आहे. अशातच मंत्रिमंडळाचा विस्तार कुठल्याही क्षणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या पिंजऱ्यामध्ये कोंबडा, कोंबडी -यापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेतील ९ खासदार व २२ आमदार हे भाजप कडून दिल्या जाणाऱ्या सापत्नभावाच्या वागणुकीने नाराज आहेत. ते पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे (उबाठा) मुखपृष्ठ असलेल्या सामनाच्या अग्रलेखात सुद्धा शिंदे गटातील आमदार, खासदार हे भाजपच्या पिंजऱ्यामध्ये कोंबडा, कोंबडी प्रमाणे कैद असल्याचं सांगत त्यांच्या गळ्यावर कधीही सुरी फिरवली जाईल, हे सांगू शकत नाही? असा निशाणा साधला होता. तसेच भाजपकडून सतत दिल्या अशा पद्धतीच्या सापत्न व्यवहारामुळे स्वतःची सुरक्षा व आत्मसन्मानासाठी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपशी नाते तोडले होते. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली होती असेही म्हटले होते.

जागा वाटपावरून नाराजी-शिंदे गटाचे मुंबईचे खासदार, गजानन कीर्तिकर यांनी भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे गटाला सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिंदे गट, शिवसेना, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) एक घटक आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसेनेला त्याप्रमाणे दर्जा व वागणूक मिळाली पाहिजे. पण तसे होताना दिसत नसल्याने कीर्तीकरांनी नाराजी व्यक्त केली होती.

शिंदे गटाचे १३ खासदार केंद्रामध्ये भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे शिवसेना जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक घटक पक्ष आहे. तर त्यांना त्याच पद्धतीने वागणूक भेटायला हवी व त्यांची काम व्हायला पाहिजेते-शिंदे गटाचे खासदार गजान कीर्तिकर

शिंदे गटातील आमदार नाराज?लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने २०१९ च्या २५ व शिवसेनेने २३ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. म्हणून जागा वाटप सुद्धा याच पद्धतीने व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा कीर्तीकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत केली होती. या अनुषंगाने सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष करून मंत्रिमंडळ विस्ताराला भाजपकडूनच उशीर होत असल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे चित्र बघायला भेटत आहे. त्या सर्व दृष्टिकोनातून फडणवीस-शिंदे भेट फार महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच राज्यातील घडामोडी वेगाने होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे रात्रीस खेळ चाले, पुन्हा सुरू झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा-

  1. Devendra Fadnavis Met Raj Thackeray : राज ठाकरेंसोबत भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...
  2. BMC Election 2023: मुंबई मनपाच्या निवडणुकीत राजकारण तापणार, ठाकरे गटाला धक्का देण्याकरिता भाजपसह शिंदे गटाकडून नियोजन
  3. Ambadas Danve On Shinde Govt: शेतकऱ्यांना मदतीपर अनुदान घोषणेचा शिंदे सरकारला विसर - अंबादास दानवे

ABOUT THE AUTHOR

...view details