मुंबईGirgaon Chowpatty: चौपाटी याच ठिकाणी तयार करण्यात आलेल्या ग्लो पार्कचे लोकार्पणही यानिमित्ताने करण्यात आले. (Light and Sound Show) तसेच येत्या काळात विविध थोर पुरूष आणि विविध विषयांवर आधारित लाईट एण्ड शो प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून पहायला मिळतील, असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. (Devendra Fadnavis)
उद्यानाच्या सुशोभिकरणाचा निर्णय:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वराज्यभूमी येथे सुशोभीकरणाच्या कामासाठी तसेच याठिकाणी नागरिकांना देण्यात येणार्या सुविधेसाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सतत पाठपुरावा केला आहे. विविध सेवा सुविधा देण्याचा विषय त्यांनी उचलून धरला. मुंबई महानगरातील नागरिक आणि मुंबईत येणारे पर्यटक गिरगाव चौपाटी येथे आवर्जून येतात. स्वराज्यभूमीवरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळादेखील आहे. हा परिसर उद्यानाच्या स्वरूपात पूर्वीपासून विकसित आहे. या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेता याठिकाणी प्रोजेक्शन मॅपिंगसह लाईट एण्ड साऊंड शो सुरू करण्याचा तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला.
पार्कमध्ये या वैशिष्ट्यांचा समावेश:महानगरपालिकेच्या डी विभागाच्या माध्यमातून टिळक उद्यानात ही विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. रायगडाच्या या प्रतिकृतीवर वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित प्रोजेक्शन मॅपिंग करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिवराज्याभिषेक, रामायणातील प्रसंग, लोकमान्य टिळक यांचा जीवनपट, मुंबई शहराची ठळक वैशिष्ट्ये यांचा समावेश आहे. प्रत्येक प्रोजेक्शन मॅपिंगच्या चलचित्राचा कालावधी हा ८ मिनिटांचा असणार आहे. सोबत त्याला ध्वनी संयोजक असल्यानं मुंबईकरांना आणि पर्यटकांना अनोखा अनुभव येईल, अशी माहिती डी विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.
ग्लो पार्कचे लोकार्पण:शनिवार आणि रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस तसेच स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हे प्रोजेक्शन मॅपिंगचे चलचित्र दाखवण्याचे प्रस्तावित आहे. सायंकाळी ७ ते रात्री १० वेळेत या कालावधीत प्रोजेक्शन मॅपिंग दाखवण्यात येईल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उद्यानाचे सुशोभिकरण देखील डी विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उद्यानातील पदपथ, हिरवळ, शोभिवंत फुलांची झाडे, विद्युतीकरण, हेरिटेज रेलिंग, आकर्षक आसनव्यवस्था इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उद्यानामध्ये ग्लो पार्कदेखील तयार करण्यात आले आहे. खासकरून लहान मुलांकरिता तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या कामांचे ग्लो पार्कचे लोकार्पणदेखील यानिमित्ताने झाले.
हेही वाचा:
- वडोदरा येथील तलावात शाळकरी मुलांची बोट उलटली, 15 जणांना जल समाधी
- राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम
- बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड, जन्म दाखला बनवणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश