मुंबई- राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांवर ताशेरे ओढणार 'कॅग'चा अहवाल आज सभागृहात सादर केला जाणार आहे. त्यावरून मोठा गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.
सिडकोचा विषय मुख्यमंत्री यांच्याकडे येत नसतो. तो निर्णय सिडको बोर्ड घेते. कॅग अहवालाबाबत बोलायचे तर मग तत्कालीन गृहनिर्माण विभाग यावर काय बोलले नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.