महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्रीपदावर असताना देवेंद्र फडवणीस यांनी केला कोट्यवधीचा घोटाळा - अ‌ॅड. सतिष उके - देवेंद्र फडणवीस यांनी केलेले घोटाळे

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर असता आपल्या पदाचा गैरवापर करत नागपुरातील एका संस्थेला शेकडो कोटींचा निधी मिळवून दिल्याचा आरोप अ‌ॅड. सतिष उके यांनी केला आहे.

अ‌ॅड. सतिष उके
अ‌ॅड. सतिष उके

By

Published : Jun 29, 2021, 7:06 PM IST

Updated : Jun 29, 2021, 7:55 PM IST

मुंबई- मुख्यमंत्रीपदावर असताना देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत मुख्यमंत्री सहायता निधी व सीएसआर फंडाचा शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप अ‌ॅड. सतिष उके यांनी केला आहे. नागपूर येथे असलेली संस्था डॉ. आबाजी थत्ते व अनुसंधान संस्थेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला 300 कोटींचा सीएसआर निधी मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

बोलताना तक्रादार अ‌ॅड. उके

खासगी संस्थेला तीनशे कोटींचा मिळवून दिला निधी

अ‌ॅड. सतिष उके यांच्या आरोपानुसार मुख्यमंत्रीपदावर असताना देवेंद्र फडणीस यांनी डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्था च्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यास केंद्र सरकारच्या कंपन्या व सार्वजनिक भागातील खासगी कंपन्यांच्या ट्रस्टकडून सुमारे 300 कोटींचा सीएसआर निधी मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. अ‌ॅड. सतिष उके यांच्या आरोपानुसार नागपूरमधील नॅशनल कँसर इन्स्टिट्यूट हे सप्ततारांकित रुग्णालय देवेंद्र फडणीस यांच्या संस्थेच्या मार्फत बनवून घेण्यात आले होते. यासाठी शासकीय जमीन ही कागदपत्रांमध्ये फेरफार करून घेण्यात आल्याचा ही आरोप त्यांनी केलेला आहे.

राजकीयदृष्ट्या सक्षम असल्यामुळे देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात कारवाई नाही

देवेंद्र फडणवीसस हे राजकीयदृष्ट्या सक्षम असल्यामुळे 2014 ते 2019 च्या काळामध्ये मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात कुठलीही कारवाई केली गेली नसल्याचे अ‌ॅड. सतिष उके यांनी म्हटलेले आहे. देवेंद्र फडणवीस हे डॉ. आबाजी थत्ते सेवा व अनुसंधान संस्थेचे पदाधिकारी असताना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर या संस्थेमार्फत शासकीय जमीन घेण्यासाठी त्यांनी शैलेश जोगळेकर या त्यांच्या मित्राला हाताशी धरून जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे अर्ज सादर केला होता. मात्र, या अर्जाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेल्या जमिनीच्या संदर्भात सार्वजनिक हरकती घेण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला नसल्याचा त्यांनी म्हटले ला आहे.

नागपूरमधील या संस्थेच्या घोटाळ्याचे बिंग फुटु नये म्हणून मुख्यमंत्रीपदावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मर्जीतील एक महिला अधिकारी, धर्मदाय सह-आयुक्त या पदावर नागपूर येथे नेमलेला आहे. नेमण्यात आलेला हा अधिकारी या पदावर राहून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कामांना आक्षेप घेत नसल्याचा आरोप अ‌ॅड. सतिष उके यांनी केलेला आहे. एवढेच नाही तर या संस्थेला टाटा ट्रस्टकडून 100 कोटी, कोल इंडियाकडून 25 कोटी, ओएनजीसीकडून 100 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'जेम्स' श्वानाचा मृत्यू

Last Updated : Jun 29, 2021, 7:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details