महाराष्ट्र

maharashtra

'कामगारांना पायी जाण्यापासून थांबवा, केंद्राशी समन्वय ठेवून रेल्वेची सोय करणे शक्य'

By

Published : May 9, 2020, 6:55 PM IST

कामगारांना पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी योग्य समन्वय साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करावी. औरंगाबादनजिक घडलेल्या घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई - अजूनही बरेच कामगार बांधव रस्त्याने पायीच प्रवास करताना दिसत आहेत. बहुतेक शहरांमधून पुढे येत असलेले हे चित्र अतिशय विदारक आणि सुन्न करणारे आहे. माझी राज्य सरकारला पुन्हा विनंती आहे की, केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार आहे. या कामगारांना पायी जाण्यापासून तत्काळ रोखावे आणि केंद्र सरकारशी योग्य समन्वय साधून त्यांना रेल्वेने प्रवास करता येईल, अशी व्यवस्था करावी. औरंगाबादनजीक घडलेल्या घटनेनंतर तरी किमान यातून बोध घेण्याची नितांत गरज आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे आदेश आणखी काही दिवस कायम राहणार आहेत. याच दरम्यान आता केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात परत जाता यावे, यासाठी विशेष रेल्वे आणि बसची सोय केली आहे. मात्र, आपल्या राज्यात आणि घरी परतण्यापूर्वी स्थलांतरित कामगारांची आरोग्य चाचणी आणि नोंदणी इत्यादी सर्व करणे गरजेचे आहे. त्यामुळे ह्या किचकट प्रक्रियेत पडण्यापेक्षा लोक चालत जाण्याचा निर्णय घेत पायी जात आहेत. त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत.

शुक्रवारी औरंगाबाद येथे दुर्घटना घडली तशी पुन्हा घडू नये, म्हणून आताही चालत असणाऱ्या लोकांना राज्य सरकारने थांबवावे व केंद्राशी समन्वय साधून त्यांची जाण्याची सोय करावी, अशी मागणी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details