महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis on BMC corruption : उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असून पोपटही मेला-देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis on BMC corruption

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असून पोपट मेला आहे. पण हे सांगायला कोणी तयार नसल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबई महापालिकेत गुंतला असल्याचीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : May 18, 2023, 12:57 PM IST

Updated : May 18, 2023, 6:26 PM IST

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नड्डा यांनी मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावली. विशेष मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. याच दरम्यान मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली असून पोपट मेला आहे, पण हे सांगायला कोणी तयार नाही. तर दुसरीकडे राजाचा जीव दुसऱ्या पोपटात आहे. हा दुसरा पोपट म्हणजे मुंबई महानगरपालिका आहे, असा खोचक टोलाही फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मुंबईला लुटण्याचं काम बंद करणार : उद्धव ठाकरे यांचा दुसरा पोपट कुठला तर म्हणजे बीएमसी, असे देवेंद्र फडवणीस म्हणाले. फडणवीस म्हणाले की, २५ वर्ष महानगरपालिकेचे कुरण खाऊन हे मोठे झाले आहेत. महानगरपालिका यांनी लुटून खाल्ली आहे. इतकी वर्ष मुंबईतील रस्त्यांची अवस्था फार वाईट झाली आहे. दरवर्षी रस्त्यावर दोन ते तीन हजार कोटी रुपये खर्च केले जातात. परंतु यंदा आम्ही ठरवले आहे, येणाऱ्या दिवसात संपूर्ण मुंबईचे रस्ते हे काँक्रिटचे करणार आहोत. त्यानंतर पुढील ४० वर्ष रस्त्यावर कुठल्याही पद्धतीचा खर्च करावा लागणार नाही. मुंबईला लुटण्याचे काम बंद करणार आहोत. जोपर्यंत मुंबई महापालिका तिजोरी मुंबईकरांच्या हाती देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.

आम्हाला मुंबई महानगरपालिका कुणाला महापौर किंवा उपमहापौर बनवण्यासाठी जिंकायची नाही. तर मुंबई महापालिका आणि महापालिकेची तिजोरी ही मुंबईकरांच्या हाती द्यायची आहे. यासाठी सर्व आघाडी, मोर्चांनी ताकद लावली तर मुंबई महापालिकेवर भाजप, शिवसेना व रिपाईचा भगवा यंदा फडकल्याशिवाय राहणार नाही' - देवेंद्र फडवणीस

उद्धवजी राजा महाराजांपेक्षा कमी नाहीत : माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्ष कोरोनाचे संकट होते. या संकटाच्या काळात दुष्काळात १३ वा महिना म्हणजे तेव्हा उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. हा मोठा अन्याय होता. पण तरीही अशा परिस्थितीमध्ये भाजपाचा एकही कार्यकर्ता घरी बसला नाही. अनेकांनी आपल्या अंगावर केसेस घेतल्या, परंतु अडीच वर्ष ते संघर्ष करत राहिले व अडीच वर्षांनी आपले सरकार आले. एकनाथ शिंदे जे बाळासाहेबांची विचारधारा घेऊन पुढे चालले आहेत, त्या शिवसेनेसोबत आपले सरकार आले. परंतु उद्धवजी हे काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीत.

पोपट मेला हे सांगायला कोणी तयार नाही : उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी एका पोपटाची गोष्ट सांगितली. फडणवीस म्हणाले की, एका राजाला पोपट फार आवडायचा. पण तो पोपट मेला. आता ही गोष्ट राजाला सांगायला कोणीच तयार नाही. जो तो सांगायचा की पोपट जिवंत आहे, पण तो बोलत नाही. पोपट जिवंत आहे, पण तो चालत नाही. पोपट जिवंत आहे, पण तो मान हलवत नाही, अशी विविध कारण सांगून पोपट जिवंत असल्याचे ते सांगायचे परंतु पोपट मेला आहे, हे सांगायला कोणी तयार नाही, अशीच अवस्था आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली आहे. शिवसेना पूर्णतः संपली असून शिवसेना संपली आहे, असे सांगायला कोणी तयार नाही, म्हणूनच कोण म्हणत आहे की शिंदे यांचे १६ आमदार अपात्र होणार. कोण म्हणत आहे २२ आमदार अपात्र होणार. परंतु मी कायद्याचा अभ्यासक असून मी त्याचे पालन करणार आहे. त्याविषयी मी काही बोलणार नाही. परंतु कोणीतरी उद्धवजींना सांगायला हवे की पोपट मेला आहे, असा खोचक टोलाही देवेंद्र फडवणीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

हेही वाचा -

  1. JP Nadda Maharashtra Visit: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यकारिणीची आज पुण्यात बैठक
  2. Siddaramaiah Elected As New CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ
  3. JP Nadda Maharashtra Visit: महाविकास आघाडी सरकारने विकास कामे अडवली, मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल- जेपी नड्डा
Last Updated : May 18, 2023, 6:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details