मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी सरकारची मानसिकता दिसत नाही. सरकारने आता तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशातून बोध घ्यावा. राज्यात आरक्षण कसे लागू करता येईल, याचा विचार करावा, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणाची बाजू मांडण्यात कमी पडले ‘मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही’, फडणवीसांचा खडसेंना टोला -
भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या जीवनावर आधारित 'जनसेवेचा मानबिंदू' या संदीप नेवे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'महाराष्ट्रात विधानसभेच्या तिकीट वाटपात जे झाले, ते आता त्यांनी बिहार मध्ये करू नये', असे खडसे यांनी म्हटले होते. यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी खडसे यांच्यावरच पलटवार करत ‘मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही’, असे सुनावले आहे.
खडसे यांचे दाऊदच्या कुटुंबियांशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या हॅकर मनीष भंगाळेवर थेट कारवाई झाली होती. एकनाथ खडसे यांना त्या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली व भंगाळेला १२ तासात उचलून जेल मध्ये टाकले. असे फडणवीस यांनी सांगितले. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यावर आरोप करणार नाही. त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या घरात बसून दूर करू, असे देखील फडणवीस म्हणाले.