महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अजित पवारांच्या पाठिंब्याबद्दल वेळ आल्यावर बोलेन - देवेंद्र फडणवीस - महाआघाडीचा मुख्यमंत्री

अजित पवारांचा पाठिंबा का स्वीकारला? असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, योग्य वेळ आल्यावर बोलेन, असे वक्तव्यं फडणवीस यांनी केले आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Nov 27, 2019, 12:36 PM IST

मुंबई- मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर अजित पवारांचा पाठिंबा का स्वीकारला? असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, योग्य वेळ आल्यावर बोलेन, असे वक्तव्यं फडणवीस यांनी केले आहे.

देवेंद्र फडणवीस, काळजीवाहू मुख्यमंत्री

हेही वाचा -सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन झाले. मात्र, तीनच दिवसांत हे सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details