महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जमाफीवर सरकार शेतकऱ्यांना वेड्यात काढतंय -देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आझाद मैदान येथे भाजपचा एल्गार करत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Feb 25, 2020, 3:19 PM IST

Updated : Feb 25, 2020, 5:50 PM IST

मुंबई- आम्ही 19 हजार कोटींची कर्जमाफी केली. पण, राज्य सरकारने निवडणुकीवेळी हेक्टरी 25 हजारांची मदत आणि साताबारा कोरा करण्याचे आश्वास दिले. पण, एका दमड्याचीही कर्जमाफी झाली नाही. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना वेड्यात काढायचे काम सुरू आहे, अशी टीका सरकावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आज राज्यभर भाजपचे धरणे आंदोलन केले जात आहे. आझाद मैदानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू असून त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेवर फडणवीसांनी सडकून टीका केली. तसेच एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाणांवरही टीका केली.

हेही वाचा -कर्जमाफी, महिला अत्याचाराबाबत विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

Last Updated : Feb 25, 2020, 5:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details