नागपूर - कर्नाकमधील भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांनी केलेले वक्तव्य हे पूर्ण चुकीचे असल्याचा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा पैसा राज्य सरकारला मागीतला नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकारने एकही पैसा केंद्र सरकारला परत दिला नाही. मी ज्यावेळेस कार्यवाह मुख्यमंत्री होतो, त्यावेळेस कोणताही महत्वाचा निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
केंद्राचा 40 हजार कोटींची निधी परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्याचे खळबळजनक विधान भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केले आहे. तसेच शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे नवीन सरकार विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करणार असल्याने महाराष्ट्रात हे सत्तानाट्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सत्तानाट्य हे पूर्वनियोजीत असल्याचेही हेगडे म्हणाले. या त्यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे ते म्हणाले.