महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे हा गुंडाराज थांबवावा; निवृत्त नौदल अधिकाऱ्यास झालेल्या मारहाणीनंतर फडणवीसांची मागणी - devendra fadnavis news

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली म्हणून शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यास मारहाण केली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा हा गुंडाराज थांबवा, असे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे हा गुंडाराज थांबवावा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 12, 2020, 9:54 AM IST

Updated : Sep 12, 2020, 10:25 AM IST

मुंबई - कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख आणि अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र निषेध केला. तसेच असे कृत्य करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि हा गुंडाराज थांबवावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

व्हाट्सअॅप मेसेज फॉरवर्ड वरून झालेल्या वादातून एका माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण झाली आहे. ही घटना निंदनीय असून राज्यासह देशात अनेक वेळा अशा घटना घडलेल्या दिसून येतात. देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल अतिशय धक्कदायक आणि दुःखद घटना म्हटले आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला व्हाट्सअॅप मेसेज फॉरवर्डच्या वादातून शारीरिक इजा करण्यात आली आहे. याची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी कृपया हा गुंडाराज थांबवावा. या गुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आम्ही मागणी करतो. असे फडणवीस म्हणाले आहेत.

भाजप नेत्यांकडून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मारहाण झालेल्या माजी अधिकाऱ्याला आज भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाणार आहेत. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबई महापालिकेने केलेली कारवाईनंतर शिवसेनेला सोशल मीडियातून निशाणा बनवले जात आहे. काही आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्यास मारहाण केली.

Last Updated : Sep 12, 2020, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details