मुंबई- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल केलेल्या ट्विटसंबंधी दिलगिरी व्यक्त केली आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते, असा उल्लेख फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली होती. तसेच भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी केली होती.
हेही वाचा -मुंबईत संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या 11 हजार जणांवर कारवाई
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनातसुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे ट्विट करत फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, 6 मे ला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन होता. त्या निमित्ताने फडणवीस यांनी ट्विट करून अभिवादन केले होते. मात्र, त्यात झालेल्या चुकीमुळे फडणवीस यांच्याविरोधात रोष व्यक्त होत आहे. यावेळी त्यांनी ट्विट करताना शाहू महाराजांचा थोर सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केला होता.
हेही वाचा -'हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा, त्यांची क्रूर चेष्टा करण्याचा, हाच का तो तुमचा सायन पॅटर्न?'