महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ दूर करा, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र - मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे

राज्याच्या सरासरीच्या कितीतरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच आयसीएमआरच्या नव्या निर्देशांप्रमाणे ‘अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती आता वापरावी, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे असे फडणवीस म्हणाले.

devendra fadanvis
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ दूर करा, फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती पत्र

By

Published : Apr 19, 2020, 9:48 PM IST

मुंबई- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात 63 ते 79 टक्के कोव्हिड रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे लक्षणं नसलेल्यांची चाचणी न करणे हे अतिशय घातक ठरू शकते. आयसीएमआरने कोरोना तपासणीचे जे प्रोटोकॉल ठरवून दिले, त्याचे तंतोतंत पालन करावे आणि कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ दूर करण्यात यावा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून विनंती केली आहे.

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ दूर करा, फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना विनंती पत्र
राज्यातील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीकडे लक्ष वेधण्याबरोबरच काही गोष्टींचे पालन करण्याची विनंती केली आहे. ‘१५ एप्रिल २०२० रोजी मुंबई महापालिकेने लक्षणे नसलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी राज्याच्या सरासरीच्या कितीतरी अधिक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणूनच आयसीएमआरच्या नव्या निर्देशांप्रमाणे ‘अ‍ॅग्रेसिव्ह टेस्टिंग’ हीच रणनीती आता वापरावी, अशी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे असे फडणवीस म्हणाले.लक्षणे नसलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींसंदर्भात १०० टक्के चाचण्या केल्याच पाहिजेत, असे दिशानिर्देश ‘आयसीएमआर’नं स्पष्टपणे दिले असताना मुंबई महापालिकेनं मात्र आवश्यकता वाटली तर करता येईल, असा आदेश काढला आहे. हे चुकीचे असून सर्वांची चाचणी व्हावी, अशी आमची मागणी आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details