मुंबई: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विरार मधील हॉस्पिटलच्या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. यावर फडणवीस म्हणाले, की 'ही अत्यंत क्लेशदायी आणि संतापजनक घटना आहे. या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे'.
महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. तसेच राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.