महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

मागील महिनाभरात संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. अवेळी आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री मदत निधीतून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार होती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट

By

Published : Nov 15, 2019, 1:13 PM IST

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मुंबईतील राजभवनात फडणवीस आणि राज्यपाल यांची ही भेट झाली. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत निधी देण्याची विनंती फडणवीसांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली.

मागील महिनाभरात संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. अवेळी आलेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री मदत निधीतून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार होती.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली

दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडींनी वळण घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सध्या राज्याची सूत्रे राज्यपालांच्या हातात असल्याने शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा अधिकारही राज्यपालांनाच आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांसोबतच गरजू रुग्णांनाही मदत निधी देण्याची विनंती माजी मुख्यमंत्र्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details