मुंबई:भाजपमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र राहून लढणार आहोत. कर्नाटकमधील नागरिकांचेसुद्धा आभार मानतो. काँग्रेस पक्षाचा प्रभाव ज्याप्रमाणे कर्नाटकात दिसला तसाच परिणाम महाराष्ट्रात दिसेल, असा विश्वास एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. आज इतर काही विषयांवर देखील चर्चा झाली.
म्हणून वारकऱ्यांवर लाठीचार्ज :महाराष्ट्रात सरकार शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तत्कालीन राज्यपाल यांनी आणि भाजपच्या अर्धा डझन मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. अनेक वर्षांची वारकरी यांची प्रथा वर्षानुवर्षे चालत आहे. अतिशय नियोजन पद्धतीने वारी प्रथा चालत आहे. या प्रथेला कसे बंद करता येईल, यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. या परंपरेला संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस काही झालेच नाही असे दाखवत, खोटे बोलत असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला.
मेरिटवर चर्चा:आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत सरकारच्या विरोधातील लढ्या संदर्भात चर्चा झाली. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीकोनातून मतदारसंघातील मेरिटच्या संदर्भात चर्चा झाली. उमेदवार निवडून येईल त्या मेरिटच्या आधारे ती जागा त्या पक्षाला दिली जाईल. निवडणुकी विषयी पुढील रणनीती अखण्यात आली. मेरिटच्या आधारावर आपण पुढे जाऊ असे महाविकास आघाडीत ठरले होते. जागा जिंकणे हे आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मागील जागा कोणाकडे आता कोणाकडे आहे असा काही वाद आमच्यात नाही. याउलट शिंदे गटात आणि भाजपमध्ये काय वाद सुरू आहे, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.