मुंबई - काकाने आपल्या पुतणीवर अनेकदा बलात्कार केला. यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोस्को न्यायालयात हा खटला सुरू झाला. बलात्काराचा गुन्हा घडला असताना पुतणीअल्पवयीन होती. तिचा गर्भ त्या काकाच्या बलात्कारामुळे झालेला नाही, हे डीएनए अहवालामध्ये दिसून आले.
मुलीचे आई 2003 मध्ये नर्मदा नदीच्या किनारी कपडे धुत होती. त्या वेळेला तिचा मृत्यू झाला. त्या मृत्यूसाठी पीडितेसाठी कटकारस्थान रचल्याचा आरोप काकाने केला. परंतु त्याच वेळेला ती मुलगी दुसऱ्या मुलाला पाहत होती, असा आरोपदेखील युक्तीवादात करण्यात आला. न्यायाधीश एस जे अन्सारी यांनी निकालात म्हटले, की डीएनए रिपोर्ट आल्यानंतर त्या बालिकेच्या डीएनए तपासणी आणि त्या आरोपीची डीएनए तपासणी केल्यानंतर वस्तुस्थिती आणि पुरावे समोर येतात. मात्र, त्यावरून त्याने बलात्कार केला नसल्याचे ठरवता येत नाही.
समाजाचे असते दडपण-आरोपीच्या बाजूने वकिलांनी मुद्दा मांडला की, मुलीने असे जे केले ते करणे उचित नव्हते. परंतु न्यायाधीशांनी कोर्टामध्ये हे सांगितलं की कुठलीही मुलगी किंवा स्त्रीही आपल्या भारतीय समाजामध्ये राहत असताना आपला समाज पारंपारिक आहे. काही वेगळ्या परंपरा निर्माण होतात. त्याच्यामुळे तिच्यावर पवित्रतेचे काही प्रभाव आहेत. त्यामुळे अशा काही घटना जर घडल्या तर त्यामध्ये कबुली द्यायला फारसे कोणी इच्छुक नसते. कारण समाजाचे दडपण असते.
Mumbai Crime News : बलात्कार केलेल्या पुतणीचा काका पिता नसल्याचे डीएनएमधून सिद्ध, तरीही आरोपी दोषी- मुंबई पोस्को न्यायालय - काका पुतणी बलात्कार डीएनए
पंधरा वर्षाच्या मुलीवर तिच्या काकानेच बलात्कार केला. यासंदर्भात मुंबईतील विशेष पोस्को न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी हा पुतणीच्या बाळाचा पिता नसल्याचे डीएनए चाचणीमधून समोर आले. मात्र, पीडितेच्या जबाबामुळे न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. 46 वर्षीय काकाला 14 वर्ष इतक्या कालावधीच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
जबाब ठरला महत्त्वाचा-डीएनए रिपोर्टमध्ये काही पुरावा समोर येत नसला, त्याने बलात्कार केला हे सिद्ध होत नसले तरी तिने दिलेल्या जबानीत त्याच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवता येतो. कारण पीडित सातत्याने असे म्हणत राहिली की तिच्यावर त्या आरोपीने वारंवार बलात्कार केला. त्यामुळे ती कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्यास तयार होती. यामधूनच ही महत्त्वाची बाब समोर येते की जरी डीएनए रिपोर्टमधून आरोपीने बलात्कार केला, असे सिद्ध होत नसले तरी पीडितेने दिलेली साक्ष महत्त्वाची आहे. ही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवित न्यायालयाने 46 वर्षाच्या काकाला 14 वर्षांची कोठडी सुनावली.
हेही वाचा-