मुंबई -कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ( Karnataka Chief Minister ) महाराष्ट्रातील दोन शहरांवर केलेला दावा निरर्थक आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा उपसभापती नीलम गोऱ्हे ( Dr. Neelam Gorhe ) यांनी तीव्र शब्दांत निषेध करत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा समाचार ( Neelam Gorhe criticized Karnataka Chief Minister ) घेतला.
कर्नाटकडून दिशाभूल - महाराष्ट्रात अक्कलकोट, सोलापूर सारख्या शहरांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून कानडी भाषिक स्थलांतरीत नागरिक राहत आहेत. आता हे महाराष्ट्राचे अविभाज्य भाग बनले आहेत. न्यायालयात या प्रश्नावर सुरू असलेली चौकशी आता ऐरणीवर आली आहे. स्वतकडील लंगडी बाजू लपविण्यासाठी कर्नाटकने अशा प्रकारे विधाने करण्यास सुरुवात केली आहे. अशी उलट सुलट विधाने करून जनतेची दिशाभूल करणे, अशा प्रकारे केंद्र सरकारच्या कामाची पद्धत असल्याचे दिसून येत असल्याचे उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले.