मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो आहे. काही जण मास्क घालणार नाही, म्हणतात. 'आरं बाबा, तुला काय कोरोना व्हायचा ब्यायचा न्हाय. पण, तुझ्यामुळं दुसऱ्याला व्हइल त्याचं काय', अशी मिश्किल टीका अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. सभागृहात यावर एकच हशा पिकला.
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मास्क न लावता आले होते. पत्रकारांनी त्यांना छेडले असता, ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असे प्रतिउत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विधान परिषदेत राज ठाकरे यांना नाव न घेता चिमटा काढला. त्यानंतर 'दरेकर असे कसे तुमचे जुने नेते', असा टोला लगावला. यानंतर सभागृहात हशा पिकला.
दरेकरांचे जॅकेट बघूनच कोरोना जवळ गेला नसेल
राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या सगळ्यांसाठीच तो चिंतेचा विषय आहे. विधान परिषदेत कोरोनाची सविस्तर आकडेवारी, राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या व केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाचे वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत दिली. यावेळी अजित पवारांनी दरेकरांवर टोलेबाजी केली. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानवपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोना झाला नसल्याचे सांगतानाच दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल, असे अजित पवार म्हणताच हास्यकल्लोळ उडाला.
तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल