मुंबई - महापालिकेच्या रुग्णालयात सहाय्यक आयुक्तांची सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याला सर्व पक्षीय गटनेते व नगरसेवक यांनी विरोध केला. त्यामुळे माजी डेप्युटी डीनला सीईओ करण्याचा निर्णय पालिका गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयात प्रिन्स हा दोन महिन्यांचा मुलगा शॉकसर्किटमुळे भाजला गेला. या दुर्घटनेमुळे त्याचा हात कापावा लागला. या प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने रुग्णालयाचे कामकाज पाहण्यासाठी सीईओ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांची नेमणूकही केली. मात्र या नियुक्तीला नगरसेवकांचा विरोध असल्याने पालिका गटनेत्यांच्या बैठकीत त्याला विरोध करण्यात आला.