मुंबई -नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिकामे झाले आहे. या पदासाठी निवडणूक न होता बिनविरोध निवड व्हावी, यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न केली जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची निवड बिनविरोध झाली होती. त्याच पद्धतीने विधानसभा अध्यक्षाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहे.
विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार - अजित पवार - उपमुख्यमंत्री अजित पवार लेटेस्ट न्यूज
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपद नेमके कोणाला दिले जाणार हे स्पष्ट झाले की, निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीत याबाबद्दलची निश्चितता झाल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या सोबतही चर्चा करून अध्यक्ष बिनविरोध निवडून द्यावा, अशी विनंती केली जाणार आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपद नेमके कोणाला दिले जाणार हे स्पष्ट झाले की, निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार आहेत. महाविकास आघाडीत याबाबद्दलची निश्चितता झाल्यानंतर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबतही चर्चा करून अध्यक्ष बिनविरोध निवडून द्यावा, अशी विनंती केली जाणार आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
ज्या शाळांनी निकष पूर्ण केले आहेत त्या शाळांना अनुदान मिळणार
20, 40, 60, 80 आणि 100 टक्के अनुदान हे शाळांना दिले जाणार आहे. मात्र हे अनुदान केवळ त्या शाळांना दिले जाणार आहे. त्या संबंधीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ज्या शाळांनी अनुदानसंबंधीचे निकष पूर्ण केले आहेत त्यांना अनुदान दिले जाणार असल्याच यावेळी अजित पवार म्हणाले. सप्टेंबर महिन्यापासून ठाकरे सरकारने विनाअनुदानित शाळांना अनुदान दिलं नसल्याने गेल्या 22 दिवसापासून राज्यभरातून अनुदानित शाळेचे शिक्षक आंदोलन करत आहेत. मात्र त्यांना लवकरात लवकर दिलासा दिला जाईल, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.