महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लेखणी बंद आंदोलनावर आज अजित पवार काढणार तोडगा; अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी राज्यभरात संभ्रमाचे वातावरण - अजित पवार बातमी

उपमख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या तोडगा काढणार आहेत. यासाठी मंत्रालयात लेखणी बंद आंदोलन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत मंत्रालयातील उपमख्यमंत्र्यांच्या दालनात सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.

लेखणी बंद आंदोलनावर आज अजित पवार काढणार तोडगा; अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी राज्यभरात संभ्रमाचे वातावरण
लेखणी बंद आंदोलनावर आज अजित पवार काढणार तोडगा; अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी राज्यभरात संभ्रमाचे वातावरण

By

Published : Oct 1, 2020, 12:41 AM IST

मुंबई - मागील तीन दिवसांपासून राज्यातील विद्यापीठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलल्या लेखणी बंद आंदोलनावर गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी उपमख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या तोडगा काढणार आहेत. यासाठी मंत्रालयात लेखणी बंद आंदोलन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत मंत्रालयातील उपमख्यमंत्र्यांच्या दालनात सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे.

राज्यातील विद्यापीठ अधिकारी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आपले लेखणी बंद आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला, तर काही संघटनांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षा झाल्यानंतर हे आंदोलन सुरू करू असा विचार समोर आणला होता. मात्र त्यातही एकमत न झाल्याने याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याविषयी मार्ग काढण्यासाठी साकडे घालण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बैठक होणार असून त्यानंतरच लेखणी बंद आंदोलन हे मागे घेतले जाणार असल्याचे या कृती समितीचे दीपक घोणे यांनी सांगितले.

राज्यातील १४ विद्यापीठांपैकी बहुतांश विद्यापीठांमध्ये १ ऑक्टोबरपासून अंतिम वर्षांच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे. लेखणी बंद आंदोलन सुरू झाल्याने या परीक्षांना मोठा फटका बसेल म्हणून यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठांनी आपल्या अंतिम वर्षांच्या परीक्षा या पुढे ढकलल्या आहेत, तर उर्वरित विद्यापीठांपैकी अनेक विद्यापीठांमध्ये या परीक्षा सुरू होणार असल्याने राज्यभरात अंतिम वर्षांच्या या परीक्षांचा गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details