महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात पुन्हा टाळेबंदीचा निर्णय होण्याची शक्यता - अजित पवार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक कोरोना आढावा

अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. याबाबत तिन्ही जिल्हे आणि राज्यातील इतर ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुंबई
मुंबई

By

Published : Feb 18, 2021, 3:38 PM IST

मुंबई- राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. खास करून अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. याबाबत तिन्ही जिल्हे आणि राज्यातील इतर ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुंबई

या तीन जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत चालली असून नागरिकांकडून सुरक्षित अंतर न राखणे आणि कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने, अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच सामान्य नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर कठोर नियम लावावे लागतील, तसेच टाळेबंदी संदर्भातील निर्णय पुन्हा घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार त्यांच्याकडून देण्यात आला.

दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य विभागाचे मुख्य सचिव व्यास यांची बैठक होणार आहे. अकोला, यवतमाळ आणि अमरावती शहरापुरती टाळेबंदी करायची किंवा राज्यातील ग्रामीण भागांमध्ये देखील लागू करायची या संबंधीचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती पवार यांनी दिली.

संजय राठोड संपर्कात -

संजय राठोड हे 'नॉटरिचेबल' नसून माझ्या संपर्कात असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. यवतमाळमध्ये वाढत्या कोरोना प्रसारामुळे सरकारकडून लावण्यात येणाऱ्या निर्बंधांबाबत संजय राठोड यांच्याबरोबर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details