मुंबई -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (रविवारी) रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अतिरीक्त मदत आणि आधार देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली. तसेच आज पुन्हा राज्याचे मुख्य सचिव आणि वित्त सचिव यांच्याबरोबरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे.
अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (रविवारी) रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अतिरीक्त मदत आणि आधार देण्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली.
अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
गेल्या महिन्याभरापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या यांच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असतानाच अचानक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंतचा अवधी दिला आहे.
Last Updated : Nov 25, 2019, 4:37 AM IST
TAGGED:
Deputy CM Ajit pawar