मुंबई - महाविकास आघाडी शंभर दिवस पूर्ण करत असताना तिन्ही पक्षांमध्ये आता समन्वय दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावून गेले. मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेत आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न उपस्थित केला. मात्र, ते अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वत: उत्तर दिले.
आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले अजित पवार, फडणवीसांनी आणले होते अडचणीत - अजित पवार आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने एक प्रश्न उपस्थित केला. एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते. मात्र, पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही. यासाठी सरकार काय करणार? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. यावेळी अजित पवार आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीने एक प्रश्न उपस्थित केला. एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते. मात्र, पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही. यासाठी सरकार काय करणार? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला होता. मात्र, ते अडचणीत येतील हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वतः उत्तर दिले. ते म्हणाले की, 'गेल्या महिन्यात या संदर्भात बैठक घेतली. विरोधकांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. पायाभूत सुविधांसाठी अशा प्रकारच्या संस्था निधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांकडून जे काही सुचवण्यात येत आहे, तेच आम्ही अंमलात आणतो. त्याबद्दलच आदित्य ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी सांगितले.' अशाप्रकारे पहिल्यांदाच उत्तर देणाऱ्या आदित्य यांच्या साथीला अजित पवार धावून आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते.