मुंबई -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईतील इंदू मिल स्मारक कामाची पाहणी केली. सरकार या स्मारकासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. 14 एप्रिल २०२२ पर्यंत हे स्मारक पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दादर येथील चैत्यभूमी परिसरातील इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी त्या कामाची पाहणी केली. दोघांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.