मुंबई- घंटानाद, थाळीनाद करणाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. पण, रस्त्यावर उतरून घंटानाद करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ नये. तसेच लोकप्रतिनिधींनी तसेच प्रसारमाध्यमांनी या गर्दीला प्रसिद्धी देणे टाळा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.
'तुमचे आभार... मात्र 'अशा' लोकांना प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन देऊ नका' - घंटानाद
गर्दी केल्यामुळे कोरोनाविरोधातील मुळ उद्देशाला धोको पोहोचत आहे. त्यामुळे गर्दी करणे टाळा, रस्त्यावर उतरून सार्वजनीकरित्या घंटानाद, थाळीनाद करु नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वजण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, गर्दी केल्याने मूळ उद्देशालाच धोका पोहचत आहे. यामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिले आहे.
हेही वाचा -COVID-19 : मुंबई मेट्रो ३१ मार्चपर्यंत राहणार बंद...