महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत १५ दिवसात लेप्टोसह स्वाईनफ्लूमुळे ३ जणांचा मृत्यू - पालिकेच्या आरोग्य विभागा मुंबई

मुंबईत गेल्या काही वर्षात पावसाळ्यात आणि पाऊस पडून गेल्यावर विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. याबाबतचा अहवाल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहीर केला जातो. १ ते १५ सप्टेंबर या पंधरा दिवसाचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.

पालिका

By

Published : Sep 18, 2019, 4:46 PM IST

Updated : Sep 18, 2019, 7:47 PM IST

मुंबई- येथे पावसाळ्यात व पावसानंतर आजारपणात वाढ होते. त्यात विशेष करुन लेप्टो आणि स्वाईनफ्ल्यूचे प्रमाण जास्त असते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसात लेप्टो आणि स्वाईनफ्ल्यूमुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात लेप्टो आणि स्वाईनफ्ल्यूमुळे ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचा-विधानसभेच्या रणांगणात 'या' महिलांचा आवाज घुमणार, कोण वेधणार लक्ष?

मुंबईत गेल्या काही वर्षात पावसाळ्यात आणि पाऊस पडून गेल्यावर विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. याबाबतचा अहवाल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहीर केला जातो. १ ते १५ सप्टेंबर या पंधरा दिवसाचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार मलेरियाचे ३१९, लेप्टो २१, स्वाईनफ्लूचे ६, गॅस्ट्रोचे १९३, हेपेटायसिसचे ५७ तर डेंग्यूचे १०४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये स्वाईनफ्लूने एक तर लेप्टोमुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यू सदृश्य आजाराचे गेल्या १५ दिवसात १५३६ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मागील वर्षी ९ जणांचा मृत्यू -
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ६२५, लेप्टो २७, स्वाईनफ्लूचे १, गॅस्ट्रोचे ४४५, हेपेटायसिसचे १११, तर डेंग्यूचे ३९९ रुग्ण आढळले होते. त्यात स्वाईनफ्लूने एकाचा तर डेंग्यूमुळे ८ जणांचा अशा एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Sep 18, 2019, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details